MPCNews Special : टोळक्यांमधील वादात सर्वसामान्यांची वाहने होतात टार्गेट; भुरटी भाईगिरी संपविण्यात पोलीस अपयशी

महिन्याभरात 40 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – शहरात होणाऱ्या टोळक्यांमधील वाद आणि भांडणात सर्वसामान्य नागरिकांची वाहने टार्गेट होतात. वाद कशावरूनही झाला तरी त्याचे रूपांतर वाहनांच्या तोडफोडीमध्ये होते. (Pimpri) मागील महिनाभरात पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या दोन बससह तब्बल 40 पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड झाली आहे. यात भुरट्या भाईंचा सर्वाधिक वाटा आहे. या स्वयंघोषित भुरट्या भाईंची मुस्कटदाबी पोलीस कधी करणार, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

भोसरी आणि वाकड मध्ये दोन घटना घडल्या. भोसरी येथील घटनेत मध्यरात्री तिघांनी मिळून एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कार सह परिसरातील वाहनांची तोडफोड केली. यातील एकाने आपण भाई असून खिशातील पैसे काढून देण्याची तरुणाला धमकी दिली. स्वयंघोषित असले तरीही भाईंना देखील सर्वसामान्य नागरिकांची अशी वाटमारी करून पैशांची भूक भागवावी लागत आहे. वाकड येथील घटनेत तरुणाने कोयत्याने रिक्षावर मारून रिक्षाची, एका कार आणि अन्य वाहनांची तोडफोड केली.

Maharashtra : लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

मावळ तालुक्यातील वराळे गावात सहा जणांनी मिळून जुन्या वादातून तरुणावर गोळीबार केला. त्याची कार फोडून नुकसान केले. जुन्या भांडणातून हा प्रकार घडला.(Pimpri) यातही कार टार्गेट ठरली. रुपीनगर येथे तिघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी विनाकारण परिसरातील 26 वाहनांची तोडफोड केली. पिंपळे निलख येथे भुरट्या भाईंनी अंड्याच्या दुकानात हैदोस घातला. एका वाहनाची तोडफोड करून परिसरात दहशतही पसरवली.

पीएमपीएमएल बसची तोडफोड करून बस चालक आणि वाहक तसेच बसमधील इतर पीएमपी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा नाशिक रोड, वाकी फाटा येथे घडला. हल्लेखोराने पीएमपी बसची तोडफोड केली. बावधन येथे देखील पीएमपी बस अडवून तिची तोडफोड केल्याची घटना घडली. त्यामुळे खासगी वाहनांसह सरकारी वाहने देखील टार्गेट होत आहेत.

दहशत निर्माण करून भाईगिरी करण्याची हौस

शहरात अलीकडच्या काळात अनेक भुरटे, स्वयंघोषित भाई उदयाला येत आहेत. या भाईंना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद मिळत नसल्याने त्यांच्यातली खुमखुमी वाढत आहे.(Pimpri) परिसरात दहशत निर्माण करणे, जाणीवपूर्वक नुकसान करणे, लूटमार करणे अशा कारणांवरून हे भुरटे भाई तोडफोड करतात..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.