PMPML : पीएमपीएमएलच्या शूटिंगबॉल स्पर्धेत निगडी भक्ती शक्ती आगार प्रथम

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) यावर्षी सोळावा वर्धापन दिवस साजरा करीत आहेत. त्यानिमित्त शूटिंगबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. (PMPML) यास्पर्धेत निगडी भक्तीशक्ती आगार संघाने प्रथम क्रमांक पटकावला.तर भोसरी आगाराने दुसरा क्रमांक मिळवला. निगडी आगार संघातील ज्ञानेश्वर पवळे यांनी उत्कृष्ट खेळी केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत आनंद व्यक्त केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 19 एप्रिल रोजी पुणे येथे होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे एकूण 15 डेपो आहेत. त्यामधील 10 डेपोच्या संघानी शूटिंगबॉल स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा हडपसर येथील शेवाळवाडी आगारामध्ये मध्ये दि. 14 ते 15 एप्रिल अशी दोन दिवस संपन्न झाली.

 

Pune : पुण्यात अनोख्या “साडी रन” चे आयोजन; साडी नेसून धावल्या 5,300 महिला! 

सदर स्पर्धा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या दि.19 रोजी होणाऱ्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजयी झाल्याबद्दल भक्तीशक्ती (PMPML) आगारातील प्रमुख शांताराम वाघिरे पाटील यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले.

याचा बक्षीस समारंभ वर्धापन दिनी गणेश क्रीडा कला मंच स्वारगेट येथे संपन्न होणार आहे.या स्पर्धेमध्ये  द्वितीय क्रमांक पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या भोसरी आगरातील कर्मचाऱ्यांनी पटकावला आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.