Alandi : दारू भट्टी लावल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावल्याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत एका तरुणावर गुन्हा दाखल केला. या कारवाई मध्ये अकरा लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 23) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू येथे करण्यात आली.

Wakad : मॉर्फ केलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत मुलीची बदनामी

जयराम यादव (वय 29, रा. मोशी. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेले आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमर कदम यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी जमिनीलगत खड्डा खोदून त्यामध्ये भट्टी लावली. खड्ड्यामध्ये प्लास्टिकची ताडपत्री टाकून त्यात 11 हजार लिटर रसायन दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दरोडा विरोधी पथकाने कारवाई करत 11 हजार लिटर रसायन इतर साहित्य आणि 210 लिटर तयार हातभट्टीची दारू असा एकूण 11 लाख 42 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.