Ganeshotsav 2023 : दगडूशेठ गणपतीला 301 किलो मोतीचूर मोदक आणि 131 लिटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण

भाविकांना प्रसाद म्हणून वाटप; गेल्या अनेक वर्षांची परंपरा अखंडितपणे सुरु

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Ganeshotsav 2023) गणपतीसमोर विविध मिष्टानांचा भोग दररोज लावण्यात येतो. त्याप्रमाणे अनेक गणेशभक्त मोदक, पेढे, बर्फी देखील भोग म्हणून अर्पण करतात. मात्र, नुकतेच गणपतीला भव्य असा 301 किलो मोतीचूर मोदक आणि 131 लिटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण करण्यात आले.

Alandi : दारू भट्टी लावल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

प्रभात फरसाण व दीपक केटरर्स तर्फे दीपक मालाणी, निखिल मालाणी यांनी 301 किलो मोतीचूर मोदक आणि किगा समूहाचे संचालक गणेश गोसावी व किरण साळुंके यांनी 131 लिटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण केले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच भक्तांना दोन्ही मोदक प्रसाद म्हणून देण्यात आले.

निखिल मालाणी म्हणाले, आम्ही 301 किलो मोतीचूर मोदक बाप्पाला मोदक अर्पण केला आहे. तब्बल 20 वर्षांपूर्वी 5 किलो मोदकापासून आम्ही सुरुवात केली होती. यावर्षी 301 किलोचा मोदक तयार करण्याकरिता मोठा कालावधी लागला. तसेच याकरिता अनेक कारागिरांनी मेहनत घेतली.

गणेश गोसावी म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे 131 वे वर्षे असल्याने 131 लिटरचे आईस्क्रीम केले. याकरिता नारळाचा किस, दूध 100 लिटर यांसह इतर साम्रगी वापरण्यात आली. सुमारे 7 ते 8 दिवस आईस्क्रीम तयार करण्याकरिता लागले. तसेच उणे 22 अंश तापमानावर हे तयार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विविध प्रकारचे आईस्क्रीम बाप्पाला अर्पण करीत आहोत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.