Cricket : श्रेयश अय्यर आणि शुभमन गिलचे आस्ट्रेलिया विरुद्ध दमदार शतक

एमपीसी न्यूज – इंदोर येथील होळकर मैदानावर भारत विरुद्ध आस्ट्रेलिया दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रेयश अय्यरने 105 धावा केल्या आहेत तर दुसरीकडे शुभमन गिलने 104 धावा केल्या असून, दोघांनी दुस-या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी रचली.

Ganeshotsav 2023 : दगडूशेठ गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे स्क्रीम अर्पण भाविकांना प्रसाद म्हणून वाटप; गेल्या अनेक वर्षांची परंपरा अखंडितपणे सुरु

नुकताच दुखापतीमधून सावलेल्या श्रेयश अय्यरने आपल्या पुनरागमनाच्या दुस-याच सामन्यात एकदिवसीय करियर मधील तिसरे शतक झळकावून विश्वचषकात झालेली त्याची निवड योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. शतक करण्यासाठी यासाठी त्याने 90 चेंडूंचा खर्च केले आहे. विश्वचषकापुर्वी परत आलेल्या फॉर्म मुले भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाचा प्रश्न सुटला आहे.

तर दुसरीकडे सातत्याने धावा करणाऱ्या शुभमन गिलने शतक झळकावल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. सातत्याने धावा करणाऱ्या शुभमन गिलने एकदिवसीय करियर मधील सहावे शतक झळकावले आहे. त्याने 104 केल्या असून त्यासाठी त्याने 97 चेंडू खेळले आहेत. या दोघांच्या शतकी खेळीमुळे भारत सुस्थितीत पोहचला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.