World Cup 2023 : युवा फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण

एमपीसी न्यूज – कालपासून (World Cup 2023)भारतात एकदिवसीय वर्ल्ड्कपला सुरुवात झाली असून, यामध्ये भारताचे विविध देशांसोबत सामने होणार आहेत. त्याआधीच भारताला मोठा झटका बसला आहे. लयीत असलेला भारताचा सलामीवीर युवा फलंदाज शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाली आहे.

8 ऑक्टोबरला भारताची ऑस्ट्रेलिया सोबत लढत होणार आहे. त्यासाठी भारताचा महत्वाचा फलंदाज आजारी असल्याने भारताला सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे.

फलंदाज शुभमन गिल याला ताप आला असून त्याची डेंग्यू चाचणी (World Cup 2023) सकारात्मक आली आहे. ही बाब भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीने नकारात्मक असून ऑस्ट्रलिया सोबत होण्याऱ्या सामन्यात गिल खेळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे.

Khed : निघोजे येथील लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायातून दोन महिलांची सुटका

शुभमन गिला हा लयीत असलेला फलंदाज असून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अल्पावधीतच 6 शतक व 9 अर्धशतक लगावले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.