Pune : गणेशोत्सव काळात शहरात बॉक्स कमानींना परवानगी द्या; महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव काळात ठराविक उंचीनंतर शहरात बॉक्स कमानींना परवानगी देण्यात यावी त्याचबरोबर उत्सवादरम्यान पाच दिवस ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील गणेशोत्सवा संदर्भात महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीस मुख्य शहरांतील महापौर, राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, ठराविक उंचीनंतर मंडळांना बॉक्स कमानींसाठी परवानगी देण्यात यावी. या प्रमुख मागण्या महापौर मुक्ता टिळक यांनी केल्या आहेत. पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव गणेश मंडळांना बॉक्स कमानींसाठी परवानगी देण्यास मनाई केली होती. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनामध्ये नाराजी पसरली होती. जमिनीपासून ठराविक उंचीवर बॉक्स करण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, यंदा निर्बंध का ? असा प्रश्न देखील पोलिस अधिकाऱ्यांना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत विचारला होता. अनुचित घटना घडू नये या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.