Pimpri News : राज्य सरकारला सुप्रीम कोर्टासह सगळीकडूनच चपराक – प्रणिती शिंदे

एमपीसी न्यूज – हायकोर्टाने विकास कामांची निधीवरील स्थगिती उठविण्याचा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टानेही राज्य सरकारला नपुंसक म्हटले आहे. (Pimpri News) सुप्रीम कोर्टाची टिप्पणी अतिशय महत्वाची आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टासह सगळीकडून  राज्य सरकारला चपराक बसत असल्याचे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. भाजप आणि मनसेची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्रात 50 कोटी देवून, ईडीची भीती दाखवून सरकार स्थापन होते. जनमत नसताना सरकार स्थापन होते. महापालिका निवडणुका घेत नाहीत. कारण, कौल त्यांच्या बाजूने नाही. ही  लोकशाहीची हत्या नाही का असा सवाल करत आमदार शिंदे म्हणाल्या, कौल त्यांच्या बाजूने होण्यासाठी वाद निर्माण करतात. जातीवाद निर्माण करतात. त्यांच्या बी टीम ठिकठिकाणी भाषणे करतात आणि कौल त्यांच्या बाजूने होताना दिसला. तर, निवडणूक जाहीर करतात. पण, जनता आता याला बळी पडणार नाही. जनतेमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

IPL 2023 : गुरु विरुद्ध शिष्य मध्ये कोण बाजी मारेल?

मागील नऊ महिन्यात राज्यात काहीच कामे झाली नाहीत. लोकशाहीविरोधातील पद्धती वापरुन लोकांवर दबाव आणला जात आहे. पेटवापेटवीचे राजकारण केले जाते. जातीयवाद निर्माण करुन, धर्माचा आधार घेवून, काम नसले तिथे धर्म येतो. लोकशाही येतो. काम नसताना धर्माचा आधार घेवून निवणूक लढतात.(Pimpri News) भारताची जनता 100 टक्के सेक्युलर आहे. धर्माचा, जातीचा आधार घेवून पंतप्रधान निवडून आले नाहीत. लोकशाही स्वीकारणा-या जनतेमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, ती कीड आमच्या देशाला लावू नका, असेही त्या म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.