Talegaon Dabhade : प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समितीवर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे व रोटरीयन्स किरण ओसवाल यांची तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी नियुक्ती झाली. शुक्रवारी (दि. 4) अध्यक्ष नितीन मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ उन्मेश गट्टे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. 

त्याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सीटीचे संस्थापक अध्यक्ष तसेच नवनिर्वाचित रुग्ण कल्याण समिती सदस्य विलास काळोखे, पदाधिकारी किरण ओसवाल, पदाधिकारी संतोष लोणकर, केंद्रप्रमुख डॉ. उन्मेश गट्टे, डॉ. राजेंद्र मोहिते यांच्या समवेत नवनिर्वाचित समिती सदस्यपदी नियुक्त झालेले तानाजी मराठे व इतर मान्यवर उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र हे मावळ तालुक्यातील सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र ठरलेले असून अनेक नागरिकांना तेथे कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण करून देण्यात आलेले आहे. तेथील वाढती संख्या व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पोहोचावे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चांगल्या सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी अवगत तंत्रज्ञान असलेली साधन सामुग्रीसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे व पदाधिकारी किरण ओसवाल यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.