Maharashtra News : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 च्या प्रारुपास मान्यता

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 च्या प्रारुपास आज (बुधवार, दि. 28) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रंगला रिंगण सोहळा

केंद्रीय वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 मध्ये Finance Act, 2023 अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय वस्तू व सेवाकर कायदा, 2017 व महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 यातील तरतुदीमध्ये एकसूत्रता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, 2017 यामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते.

यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक, 2023 च्या प्रारुपास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 यामधील एकूण 22 कलमे आणि एक अनुसूची यामध्ये सुधारणा प्रस्तावित आहे.

या सुधारणांमुळे करदाते आणि वस्तू व सेवा कर विभाग यांच्यामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. सेवाकर कार्यपध्दतीचे सुलभीकरण होऊन करदात्यांचे हित साधले जाणार आहे. तसेच याद्वारे वस्तू व सेवा कर अपिल न्यायाधिकरणाबाबत सुधारणा प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.