Pimpri Chinchwad RTO News : बकरी ईदच्या शासकीय सुट्टीमुळे पिंपरी चिंचवड आरटीओच्या कामकाजात बदल

एमपीसी न्यूज – वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता 29 जून रोजीची वेळ आरक्षित केलेल्या सर्व वाहन मालकांना पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pimpri Chinchwad RTO News) 4 जुलै ही नवीन तारीख आरक्षित करण्यात आलेली आहे.

Maharashtra News : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 च्या प्रारुपास मान्यता

29 जून रोजी बकरी ईदची शासकीय सुट्टी जाहीर झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता वाहन मालकांना पूर्वनियोजित वेळ ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करुन दिलेली असते.

संबंधित वाहन मालकांनी आता त्यांच्या वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरिता मंगळवार (दि. 4 जुलै) रोजी वाहन चाचणी पथावर आणून त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.