Vadgaon Maval : वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अर्चना म्हाळसकर

गटनेते पदी दिनेश ढोरे तर स्वीकृत सदस्य म्हणून अॅड. विजय जाधव, सुनील ढोरे यांची निवड

एमपीसी न्यूज – वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदावर भाजपच्या अर्चना संतोष म्हाळसकर यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत नगरसेवक म्हणून अॅड. विजय शिवाजी जाधव आणि सुनील गणेश ढोरे यांची निवड करण्यात आली. गटनेते पदावर दिनेश गोविंदराव ढोरे यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया आज (मंगळवारी) करण्यात आली.

उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या अर्चना म्हाळसकर आणि वडगाव कातवी नगरविकास समितीच्या पूनम जाधव हे दोन अर्ज आले. दोन अर्ज आल्याने प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. या निवडणूकीत अर्चना म्हाळसकर यांना भाजपची सात, श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडीची चार, मनसे व अपक्ष प्रत्येकी एक अशी एकूण 13 मते मिळाली. तर पूनम जाधव यांना वडगाव कातवी नगरविकास समितीची 5 मते मिळाली.

भाजपाचे सात सदस्य असल्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्य पदाचा पहिला मान मिळाला. भाजपाकडून अॅड. विजय जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. तर श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडीचे संख्याबळ सहा असल्याने आघाडीकडून सुनील ढोरे यांची निवड करण्यात आली. निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि सहाय्यक मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.