Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी मनसेच्या सायली म्हाळसकर बिनविरोध

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र असून त्यांचे बहुमत आहे. आघाडीतील सर्व पक्षांना संधी देण्याच्या धोरणानुसार राजेंद्र कुडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राज्यात मनसे आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने वडगाव भाजपकडून आलेला एक अर्ज देखील माघारी घेण्यात आला. त्यामुळे रिक्त जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सायली रुपेश (Vadgaon Maval ) म्हाळसकर यांची बिनविरोध निवड करण्यात झाली.
नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी प्रवीण निकम, मावळते उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे,गटनेते प्रमिला बाफना,दिनेश ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

यावेळी नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, शारदा ढोरे, पूजा वहिले, माया चव्हाण, पुनम जाधव, भाजपचे नगरसेवक किरण म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे उपस्थित होते.
निवडीनंतर माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे,भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,गुलाबराव म्हाळसकर,सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे,सुनील ढोरे,पंढरीनाथ ढोरे,राजेश बाफना, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, विशाल वहिले,अनंता कुडे आदींनी म्हाळसकर यांचा सत्कार (Vadgaon Maval ) केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.