Talegaon Dabhade : इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयात ‘व्यावसायिक व्यवस्थापन व शिष्टाचार’ विषयावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयात ‘व्यावसायिक व्यवस्थापन व शिष्टाचार’ या विषयावर डॉ. संजय उपाध्याय यांचे (Talegaon Dabhade) व्याख्यान झाले. आयुष्यात येणाऱ्या विविध संधी ओळखून त्या संधीचे सोने कसे करता येऊ शकते, याबाबत डॉ. उपाध्याय यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संधी ओळखा आणि त्याचा योग्य फायदा घ्या असे आवाहन डॉ. संजय उपाध्याय यांनी केले ते तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी मनसेच्या सायली म्हाळसकर बिनविरोध

व्यावसायिक शिष्टाचार यावर त्यांनी मुख्यत्वे प्रकाश टाकला. आयुष्यात येणाऱ्या विविध संधी ओळखून त्या संधीचे सोने कसे करता येऊ शकते याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, संयम कसा राखावा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  विपणन व्यवस्थापन (marketing management ) कसे असावे  यासाठी त्यांनी नवीन कारकीर्द सूरू करू पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा दिली.

सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी प्रा. पूजा कुंभार, प्रा. श्याम आवटे यांच्या सह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष  शैलेश शहा,विश्वस्त निरुपा कानिटकर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती जोपासण्याचे आवाहन (Talegaon Dabhade) केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश म्हस्के यांनी केले.सूत्रसंचालन कु. शितल गिरी हिने तर आभार कल्याणी कोकणे हिने मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.