Mumbai : 65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

Artists and crew members above 65 years of age are allowed to shoot - Cultural Affairs Minister Amit Deshmukh.

एमपीसी न्यूज – चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरिता मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक 30 मे 2020 व दिनांक 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या.

या सूचनांमध्ये, 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.

तथापि, उच्च न्यायालयाने सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने, आता 65 वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील अशीही माहिती देशमुख यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.