Maval Corona Update : मावळ तालुक्यात 51 नवीन रुग्ण; 46 जणांना डिस्चार्ज

कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 524 झाली आहे. : 51 new patients in Maval taluka; Discharged 46 people

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 19) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 524 झाली आहे. तर दिवसभरात 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 31 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 20 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एकूण 1 हजार 524 रुग्णांमध्ये सध्या 359 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 507 लोणावळा नगरपरिषद 167 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 115 रुग्ण सापडले आहेत. तर इतर रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.