karla news: वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभागाकडून जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज : वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनपरिक्षेत्र शिरोता अंतर्गत वन परिमंडळ कार्ला मधील श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्‍ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स कार्ला येथे वन्यजीव व निसर्ग याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. 

वन विभागाच्या वतीने आयोजित या जनजागृती मोहिमेत वन्यजीव रक्षक मावळ संस्थापक अध्यक्ष निलेश संपतराव गराडे अध्यक्ष श्री. अनिल आंद्रे जिगर सोळुंके सत्यम सावंत, दक्ष काटकर यांनी उपस्थित राहत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वनरक्षक गणेश धूळशेटे यांनी वन्यजीव सप्ताह का साजरा केला जातो व विद्यार्थ्यांना वनसंवर्धन व संरक्षण काळाची गरज आहे त्यामुळे वन्यजीव धोक्यात येणार नाही, याबाबत मार्गदर्शन केले.

नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा-गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

वन्यजीव सप्ताह बाबत मावळ तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मंतावार यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी पी.एम. रासकर वनरक्षक प्रवीण राऊत, सुलतान शेख यांनी भारतात सन 1952 पासून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असून वन्यजीव, पशु पक्षी या बाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच वनक्षेत्रावर शेती,रस्ते व बांधकामाच्या रुपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादेपलीकडे गेले की ते जंगलाच्या सीमेवरील खड्ड्यात घुसून वन्य प्राणी मुख्यता ; पोटासाठी गाईगुरे मारतात.

त्यातून मानव-वन्यजीव असा लढा उद्भवतो,जंगल सीमेवरील स्थानिकांना योग्य माहिती व मार्गदर्शन तसेच वन्य जीवा बद्दल माहिती देऊन त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा ज्यामुळे त्यांच्या बदलाचे गैरसमज दूर होऊ शकतात. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास व त्यावरील अतिक्रमणात नेहमी विरोध दर्शविण्यात यावे याबाबत जनजागृती करण्यात आली. सदर वन्यजीव सप्ताह मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण व उपवनसंरक्षक पुणे, राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोटे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मंतावार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

वन्यप्राण्यांच्या पर्यावरणातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले श्री एकविरा विद्या मंदिर व लाजवंती हंसराज गुप्ता जूनियर ऑफ कॉमर्स कार्ला मुख्याध्यापक श्री कैलास पारधी व सूत्रसंचालन श्री उमेश इंगुळकर व कार्यक्रमाचे आभार श्री विवेक भगत यांनी केले. या ठिकाणी विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.