Bank cheque fraud : बँकेचे कोरे धनादेश घेऊन अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : कर्ज देण्याच्या बहाण्याने बँकेचे कोरे धनादेश (Bank cheque fraud) घेऊन अडीच लाखांची फसवणूक केली. ही घटना 4 मे 2019 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत डांगे चौकवाकड येथे घडली.

अनिल शरद अहिरराव (वय 49, रा. चिखली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालाजी बळीराम घोडके (वय 32, रा. दौंड), संग्राम यादव (वय 45, रा. कोल्हापूर), बालाजी फायनान्सचे मालक मुजावर (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalewadi fraud : बांधकामात परस्पर फेरफार करत फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीस कर्ज देण्याच्या बहाण्याने दोन लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली.(Bank cheque fraud) फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी सात कोरे धनादेश घेतले आहेत. आरोपींनी फिर्यादींप्रमाणे इतर लोकांना देखील कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.