Baramati : बारामतीत बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग; घटना सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज- बारामतीतील  सहयोग सोसायटी (Baramati) परिसरात एका बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. आरोपी तरुणाने या तरुणीला जबरदस्तीने पळवून नेण्याचाही प्रयत्न केलाय. बारामती पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अरफाज सादिक अत्तार याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बारामतीत अजित पवार राहत असलेल्या सहयोग सोसायटीच्या प्रवेशद्वारा जवळच हा प्रकार घडला. पीडित तरुणी ही काही कामानिमित्त या परिसरात आली होती. यावेळी आरोपीने या तरुणीला बाहेर बोलावून घेत तू मला आवडते असे म्हणत तिच्यासोबत अश्लील वर्तन  केले. या संपूर्ण प्रकाराला पीडित तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करत भररस्त्यात ढकलून दिले.

Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या हडपसर शाखेतर्फे शंभर पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक प्रदान

दरम्यान हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संबंधित तरुणाला अटकही केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत (Baramati) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.