Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या हडपसर शाखेतर्फे शंभर पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक प्रदान

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या (Pune)  हडपसर शाखेतर्फे शंभर पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आली. या नियुक्त्यामुळे 120 जणांची नियुक्ती पूर्ण करणारी पुणे जिल्ह्यातील हडपसर ही पहिली शाखा ठरली.

यावेळी विविध गुणदर्शन व नियुक्त्या अशा भव्य कार्यक्रमात, छोटे कलाकारांनी मारुती स्तोत्र, रेणूका स्तोत्र, सुरेख  असे तबला वादन सादर सादर केले तर जेष्ठ महिलांच्या समूहाने समाज प्रबोधन पर पथनाट्य सादर करत एक सामाजिक संदेश दिला.या कार्यक्रमानिमित्त काही दिग्गज मंडळी महासंघाशी जोडली गेली.

निवृत्त न्यायाधीश विद्याधर कुलकर्णी, साने गुरुजी प्रतिष्ठान व रुग्णालयाचे मुख्य संचालक डॉ सुशील व डॉ प्रणिता देशमुख यांनी शाखा डॉक्टर यांनी ब्राम्हण समाजातील लोकांसाठी अल्प दरात अनेक आरोग्य योजना राबवण्याची इच्छा प्रकट केली, पुढील काही दिवसात अनेक आरोग्य शिबीरे या मार्फत घेण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.

Pune : पुण्याला 16 मे पर्यंत अवकाळी पावसापासून दिलासा, मात्र उन्हाचा कडाका वाढणार

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सरचिटणीस (महिला आघाडी) आकांक्षा देशपांडे, शाखा अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी केले तसेच जिल्हा व शाखा पदाधिकारी अमोघ पाठक, ऋचा पाठक स्मिता बुचके, अनिता काटे, अमृता मेढेकर, स्नेहल कुलकर्णी, देवश्री बोधनी, अभिजित देशपांडे, संतोष वैद्य, राजेंद्र कुलकर्णी, अशोक मेढेकर, पंकज पतके यांचा सहभाग होता.

तर पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्ष (महिला आघाडी) केतकी कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, विद्यमान नगरसेवक आबा तुपे यांनी ब्राह्मण समाजाच्या या उल्लेखनीय प्रगतीबद्दल कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी औरसंग (Pune)  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.