Karnataka Election : मतदानाच्या आणि आदल्या दिवशी मंजुरीशिवाय वृत्तपत्रात जाहिरात नको

एमपीसी न्यूज-कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका 10 मे रोजी होणार असून ( Karnataka Election )  त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय पक्ष व उमेदवार किंवा अन्य कोणत्याही संस्थेने मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीच्या मंजुरी शिवाय मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी (सायलेंन्स पिरेड) कोणतीही जाहिरात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करू नये असे सांगितले आहे.

कर्नाटक मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सुरू असलेला प्रचार आज  संपणार आहे.कर्नाटक मध्ये होणाऱ्या विधानसभा राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराची पातळी खाली आणू नये तसेच अतिशय गंभीरपणे प्रचार मोहीम राबावी असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Baramati : बारामतीत बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग; घटना सीसीटीव्हीत कैद

निवडणूक आयोगाने कर्नाटक मधील वृत्तपत्रांच्या संपादकांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे पत्रकारांच्या आचरणाबद्दल प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे नियम तयार केले आहेत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यासह अन्य सर्व बाबींबद्दल हे नियम पत्रकारांना लागू होत असतील नियम भंग झाला तर पत्रकारांना जबाबदार धरण्यात येईल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे .

नियमांचे काटेकोर पालन करा निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की मतदानाचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी राजकीय पक्ष उमेदवार किंवा अन्य कोणत्याही संस्थेने जिल्हा किंवा राज्यस्तरावर मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीच्या मंजुरी शिवाय जाहिरात प्रसिद्ध करून नये ,तसेच सर्वांनी नियमांचे काटेकोर ( Karnataka Election ) पालन  करणे आवश्यक आहे,असे नमूद केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.