Bavdhan Crime News : जबरदस्ती ऑफिसमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी

दोघा सख्ख्या भावांसह त्यांच्या मुलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जबरदस्ती ऑफिसमध्ये घुसून चाकू आणि लोखंडी गज यांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई- बंगळुरू हायवे, कॅल्सॉफ्ट कंपनीनजीक बावधन याठिकाणी शुक्रवारी (दि.11) हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा सख्ख्या भावांसह त्यांच्या मुलांवर गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत काशिनाथ दगडे, मारुती काशिनाथ दगडे, मंगेश श्रीकांत दगडे आणि प्रसाद मारुती दगडे, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी मंगेश आणि प्रसाद मारुती दगडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी स्वप्निल संतोष गायकवाड (वय 30, रा. किवळे, हवेली) यांनी शुक्रवारी (दि.18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मुंबई बंगळुरू महामार्गावर सर्व्हिस रोडलगत कॅल्सॉफ्ट आयटी कंपनी शेजारी बावधन येथे ऑफिस आहे. शुक्रवारी (दि.11) ऑफिसमध्ये त्यांचा भाचा दत्तात्रय दाभाडे व सिक्युरिटी गार्ड उपस्थित होते.

त्यावेळी आरोपी श्रीकांत दगडे, त्यांचा भाऊ मारुती दगडे, मुलगा मंगेश श्रीकांत दगडे व पुतन्या प्रसाद मारूती दगडे हे जबरदस्तीने ऑफिसमध्ये घुसले. आरोपी श्रीकांत दगडे याने चाकुचा धाक दाखवून व इतरांनी हातात गज घेऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.