Bavdhan : बिलाचे पैसे मागितल्यावरून हॉटेलमध्ये तोडफोड; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या चौघांनी (Bavdhan) बिल भरले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मीरा हॉटेल, बावधन येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

निलेश सुरेश कोकाटे (वय 38, रा. बावधन), अक्षय जगदीश ढाकणे (वय 28, रा. कोथरूड), अतुल वसंत केसवड (वय 34, रा. बावधन खुर्द) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गणेश कोकाटे (रा. बावधन) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हर्शीद हरीश पुजारी (वय 23, रा. बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मीरा हॉटेल मध्ये नोकरी करतात. त्यांच्या हॉटेलमध्ये (Bavdhan) आरोपी रविवारी रात्री जेवण करण्यासाठी आले. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल भरले आणि ते पुन्हा टेबलवर जाऊन बसले.

Pimpri : गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततेत, सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा

तिथे साफसफाई करणाऱ्या हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडून ‘तू आमच्याकडे बिल मागतो का, तुला माहित नाही का आम्ही कोण आहे’ अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला खुर्ची फेकून मारत शिवीगाळ केली.

हॉटेलच्या गार्डनमध्ये ठेवलेले काचेचे ग्लास, टेबल, खुर्चीची तोडफोड करून बिलिंगसाठी ठेवलेला संगणक देखील फोडला. त्यांनतर आरोपी कारमधून पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.