Beating Wife: कायमचे माहेरी जावे यासाठी पत्नीला मारहाण, पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नीने कायमचे माहेरी निघून जावे यावरुन पतीने पत्नीला शिवीगाळ करुन हाताने, लाथाबुक्यांनी (Beating Wife)  मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीच्या बहिणीलाही मारहाण केली. ही घटना जून 2019 ते 12 जून 2022 दरम्यान तनिष ऑर्चिड च-होली येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती निरज पुरुषोत्तम वर्डीकार (वय 31, रा. च-होली) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalewadi News: दुचाकीचा कट, जीव वाचविण्यासाठी गाठली पोलीस चौकी, पण टोळक्यांकडून चौकीवरच दगडफेक

 

पती निरज याने पत्नीला तु आवडत नाही. माहेरी जावू नये, नोकरी करु नये, घराचे बाहेर जावू नये यावरुन वारंवार शिवीगाळ, मारहाण केली. मानसिक, शारिरीक त्रास दिला. तसेच रविवारी पत्नीने कायमचे माहेरी निघून जावे यावरुन पत्नीला शिवीगाळ केली. हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण (Beating Wife)  केली. फिर्यादीची बहिण भांडण सोडविण्यासाठी मध्ये आली असता तिलाही शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.