Wanwadi Area : पावसाळी पाइपलाइनच्या कामानिमित्त वानवडी भागात वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – वानवडी भागात (Wanwadi Area)  पीओडब्ल्युडी रोड,एएफएमसी रोड, मज्जिद गेट जवळ पावसाळी पाईपलाईनचे काम करण्याचे असल्याने या भागातील वाहतुकीमध्ये सोमवारी रात्री दहापासून बदल करण्यात येत आहे.हा बदल पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचे वाहतूक पोलीसांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त वाहतूक राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

Moshi News: ‘तुझी विकेटच टाकतो’ म्हणत पोलिसाला मारहाण; आरोपी अटकेत

वानवडी (Wanwadi Area)  वाहतुक विभागातर्फे पुढीलप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

भैरोबानाला चौकाकडुन वानवडी बाजार पोलीस चौकीकडे जाण्यास बंदी करण्यात आली आहे.या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून भैरोबानाला चौकाकडुन वानवडी बाजार (लुल्लानगर) कडे जाणारी वाहतूक भैरोबानाला चौकाकडून सरळ टर्फक्लब चौकापुढे मम्मादेवी चौकातून डावीकडे वळुन लींब सेंटर चौकातून पुढे वानवडी बाजार व्हाया जक्शन येथून इच्छितस्थळी जाईल.

 

लुल्लानगरकडून येऊन वानवडी बाजार व्हाया जक्शन येथून भैरोबानाला चौकाकडे जाणार्या वाहतुकीला बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – लुल्लानगर चौकातून सरळ सीटीसी हॉस्पिटल चौक सरळ गोळीबार मैदान चौक पुढे सरळ खाण्यामारुती चौक उजवीकडे वळून सोलापूर रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल.

 

 

 

लाल बहादूर शास्त्री रस्त्याने येऊन सेंट पॅट्रीक चर्च रोडने पुढे भैरोबानाला चौकातून उजवीकडे वळून सरळ टर्फक्लब चौक पुढे मम्मादेवी चौक डावीकडे वळून लिंब सेंटर चौक पुढे वानवडी बाजार व्हाया जंक्शन पुढे इच्छितस्थळी जाता येईल.

 

शिवरकर रस्त्याने येऊन रिलायन्स मार्ट शेजारील लेन (भैरोबा रोड) वाहतुकीकरीता बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग – शिवरकर रस्त्याने सरळ पुढे जावून जांभूळकर चौकातून उजवीकडे वळून अंध शाळेसमोरुन वानवडी बाजार चौकी पुढे इच्छितस्थळी जाता येईल.  

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.