Moshi News: ‘तुझी विकेटच टाकतो’ म्हणत पोलिसाला मारहाण; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला (Moshi News) एकाला मारहाण करत आरडाओरड करत असल्याबाबब विचारणा करणा-या पोलिसालाच मारहाण केली. गुन्हा दाखल केल्यास तुझ्या कुंटुंबाला संपवून टाकतो. तुझी विकेटच टाकतो अशी धमकीही दिली. ही घटना रविवारी (दि.12) रात्री साडेबाराच्या सुमारास मोशी येथे घडली.

महादेव दत्तात्रय खंडागळे (वय 40, रा. चांदोली, राजगुरुनगर, खेड) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस नाईक बिराप्पा दत्तू बनसोडे यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Atm Machine Stomach : गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा कापताना एटीएम मशीन पेटले, 4 लाख जळून खाक

फिर्यादी बनसोडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी महादेव याने अमली पदार्थाचे सेवन केले होते. रविवारी रात्री आरोपी महादेव हा रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीला धक्काबुक्की करुन आरडा-ओरड करत होता. त्यामुळे पोलीस नाईक बनसोडे यांनी आरोपी महादेव याच्याकडे विचारणा केली असता त्याने बनसोडे यांना मारहाण केली.

तसेच आरोपी (Moshi News) महादेव याला वैद्यकीय तपासणी करिता वायसीएम हॉस्पिटल येथे घेऊन गेले होते.  तिथे केस पेपर काढण्यासाठी जात असताना आरोपी महादेव याने ‘तू माझ्यावर गुन्हा दाखल केला. तर, मी तुझ्या कुटुंबाला संपवून टाकतो’ अशी धमकी दिली. शिवीगाळ केली. तुझी विकेटच टाकतो असे म्हणत फिर्यादी बनसोडे यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.