Tathewade News: सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने स्वाती अरू सन्मानित

एमपीसी न्यूज – ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या प्राचार्य स्वाती अरू यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून डी एफ एल समुहाने आझाद हिंद प्रदर्शन व परिषदेचे पिंपरीत आयोजन केले होते. (Tathewade News) या सोहळ्यामध्ये ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्वाती अरू यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून डिव्हाईन महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.

Mangalmurti : मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ

स्वाती अरू यांना हा पुरस्कार त्यांना शिक्षण क्षेत्रातील असाधरण व उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला.(Tathewade News) याप्रसंगी मेजर जनरल जी. डी. बक्षी, जीपी कॅप्टन डी. के. दास, व्हीआरसी मेजर उदय साठे, श्रावण हर्डीकर, एअर मार्शल भुषण गोखले, डब्ल्यू जी सी डी आर जगमोहन नाथ असे संरक्षण सेवेतील अनेक मान्यवर व अधिकारी  उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.