Mulshi fraud Case : जमिनीच्या व्यवहारात तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – जमिनीच्या व्यवहारात (Mulshi fraud Case) तिघांची तीन कोटी नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 21 मे 2015 ते 26 जुलै 2022 या कालावधीत मुळशी येथे घडला आहे.
अशोक रामचंद्र बनकर (वय 45, रा. हिंजवडी), गोपाळकृष्ण बाजीराव अंकुशराव (वय 38, रा. पिंपळे सौदागर), महिला आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय निवृत्ती शिंदे (वय 52, रा. निगडी प्राधिकरण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Tathewade News: सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने स्वाती अरू सन्मानित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए बी डेव्हलपर्सचे मालक अशोक बनकर, गोपाळकृष्ण अंकुशराव यांच्या वतीने कुलमुखत्यारधारक महिला आरोपीने फिर्यादी, त्यांचे वडील आणि भाऊ यांचा विश्वास संपादन करून त्यांची मुळशी तालुक्यातील नेरे येथील एक हेक्टर 71 आर शेत जमीन चार लाख 10 हजार रुपये प्रति गुंठा या प्रमाणे सात कोटी एक लाख 25 हजारांना घेण्याचे ठरवले. दस्त नोंद केल्यानंतर एक वर्षात सगळे पैसे दयायचे ठरले असताना फिर्यादींना आतापर्यंत तीन कोटी 91 लाख 75 हजार रुपये दिले. उर्वरित तीन कोटी नऊ लाख 50 हजार रुपये दिले नाहीत.
आरोपींची अगर त्यांच्या कंपनीची जमिनीच्या (Mulshi fraud Case) सात बारा उता-यावर नोंद नसताना त्यांनी जयेश धर्मेंद्र सिंग राठोड यांना प्रति गुंठा चार लाख सहा हजार 593 रुपये प्रमाणे 91 आर शेत जमीन विकली. गोपालकृष्ण अंकुशराव यांचे साथीदार सचिन वसंतकुमार हाके, औदुंबर प्रतापराव पाटील, राहुल प्रकाश डावळे, भरत कृष्णदेव माने यांना राहिलेली 80 आर इतकी शेत जमीन एक लाख रुपये प्रतिगुंठा प्रमाणे खरेदीखत दस्त करून विकली. यात फिर्यादी, त्यांचे वडील आणि भावाची तीन कोटी नऊ लाख 50 हजारांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.