Nude Photoshoot Case: न्यूड फोटोशूटप्रकरणी अभिनेता रणवीर सिंग विरोधात पुण्यात तक्रार दाखल

एमपीसी न्यूज: हिंदी चित्रपट अभिनेता रणवीर सिंग यांनी केलेल्या न्यूड फोटोशूटप्रकरणी आता पुण्यातही त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुणे मनसेकडून ही तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. (Nude Photoshoot Case) अशा प्रकारचे फोटो शूट करून रणवीर महिलांच्या भावना दुखावतोय असा आरोप एका एनजीओकडून करण्यात आला आहे. 

 

रणवीर सिंग यांनी अशा प्रकारे न्यूड फोटोशूट करून हिंदू संस्कृतीचा अपमान केला त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम 354, 509 आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे नेते निलेश काळे यांनी केली आहे. रणवीर सिंग यांनी हिंदू संस्कृतीचा अपमान होईल असे फोटो काढले आणि ते आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहताना स्त्रियांना लाज वाटेल आणि तरुण वर्ग बिघडण्याची शक्यता आहे. (Nude Photoshoot Case) त्यांच्याबरोबर वाईट संस्कार होण्याची भीती देखील दर्शवली आहे असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

 

त्यामुळे रणवीर सिंग च्या सोशल मीडिया वरून हे न्यूड फोटो लवकरात लवकर काढावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. रणवीर सिंग हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याचे अनुकरण इतर लोकही करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना चाप बसवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगत कारवाईची मागणी करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.