PCMC News: महापालिकेचे सर्व विभाग ‘ट्विटर’चा वापर करणार

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देताना नागरी सहभाग देखील या प्रक्रीयेमध्ये असावा याकरीता महापालिका विविध संवाद माध्यमांचा प्रभावी वापर प्रशासकीय कामकाजात करीत आहे.(PCMC News) जलदगतीने माहितीचा प्रसार आणि नागरी संवाद साधण्यासाठी आता महापालिकेचे सर्व विभाग ई-मेल बरोबरच ट्विटरचा वापर देखील करणार आहेत.

 

नागरिकांसमवेत संवादपुर्ण नाते निर्माण करण्यासाठी ट्विटर सारखे जलद द्विसंवादी माध्यम प्रभावी ठरणार असून महापालिकेची सकारात्मक प्रतिमा उंचाविण्यासाठी ट्विटर उपयुक्त ठरेल. (PCMC News) नागरिकांनी या माध्यमातून प्रशासनाशी संवाद साधावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात सर्व विभागप्रमुखांना ट्विटर वापरा विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्यलेखापरिक्षक प्रमोद भोसले, सह शहर अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, संजय खाबडे, ज्ञानदेव जुंधारे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, उप आयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख  उपस्थित होते.

 

Mangalmurti : मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ

 

आयुक्त  राजेश पाटील म्हणाले, लोकांसमवेत संवाद साधण्यासाठी प्रशासकीय कामकाजामध्ये विविध माध्यमांचा वापर होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या योजना, सुविधा, उपक्रम आदी बाबी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्विटर सारखे माध्यम वापरात आणले पाहिजे. (PCMC News) महापालिकेचे तसेच महापालिका आयुक्त म्हणून माझे स्वत:चे ट्विटर अकाऊंट आहे. आता जागतिक पातळीवर या माध्यमाचा वापर वाढत आहे. हे संवेदनशील माध्यम असून वापरण्यास सुलभ आहे. महापालिकेने  नागरिकांकरीता व्हॉटस् ऍप – चॅट बॉट प्रणालीचा वापर सुरु केला आहे.

 

या प्रणालीवर दैनंदिन 100 पेक्षा अधिक व्यक्ती संवाद साधून आपल्या सूचना, तक्रारी आणि म्हणणे मांडतात. यामुळे प्रशासन गतीमान होण्यास मदत होत आहे. आता महापालिकेच्या सर्व विभागांचे स्वतंत्र ट्विटर अकाऊंट असणार आहे. त्यामुळे त्या विभागातील नागरिकांशी संबंधित बाबी ट्विट करुन नागरिकांना त्याबद्दल अवगत केले जाणार आहे. नागरिकांना या माध्यमातून प्रतिसाद देणारे प्रशासन म्हणून महापालिकेची ओळख होणार आहे.  (PCMC News) या माध्यमाचा उपयोग विभागप्रमुखांनी केल्यास नागरिकांच्या अडचणी, शंका यांचे निरसन जलद गतीने होऊन नागरिकांना त्वरीत सेवा मिळू शकेल.  शिवाय महापालिकेच्या फॉलोअर्समध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी व्यक्तिश: लक्ष घालून संवाद साधावा असे निर्देश आयुक्त पाटील यांनी अधिका-यांना दिले. ट्विटर हे संवादाचे पुढचे पाऊल असून नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.