Junnar News :भूगोल फाउंडेशनची किल्ले नारायणगडावर हरित शिवजयंती साजरी

एमपीसीन्यूज : भूगोल फाऊंडेशन पिंपरी चिंचवड, पुणे आणि संतनगर मित्रमंडळ, मोशी प्राधिकरण यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले नारायणगड दुर्गभ्रमण स्वच्छता, गडसंवर्धन, पर्यावरण जनप्रबोधन फेरी , वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या माध्यमातून खऱ्या अर्थाने भगव्या मशाली बरोबर हिरव्या मशाली पेटवून वसुंधरा हिरवीगार करण्यासाठी झाडे लावून आगळी वेगळी हरित शिवजयंती साजरी करण्यात आली.

महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्याचे वैभव असलेल्या प्रत्येक गडावर 391  झाडे लावण्याचा संकल्प अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रेरणेतून  पार पडला.

सध्या पर्यावरणात होत चाललेला बदल आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. यासाठी भूगोल फाऊंडेशन पिंपरी चिंचवड, पुणे आणि संतनगर मित्रमंडळ, मोशी प्राधिकरण यांनी नारायणगड, गडाचीवाडी खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थ व तरुणवर्ग यांच्या सहकार्याने खोडद गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविली.

वसुंधरा वाचविण्यासाठी व पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी पर्यावरण विषयीचे विविध फलक हातात घेऊन व संदेश-घोषणा देत पर्यावरण जनप्रबोधन फेरी काढण्यात आली. नंतर नारायणगडाच्या पायथ्याला वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक तरुणांनी गड स्वच्छता मोहीम राबविण्यात मोलाचे सहकार्य केले.

भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, कर्नल तानाजी अरबुज, शशिकांत वाडते, साहेबराव गावडे, अशोक वाडेकर, विठ्ठल लंघे, सुभाष इचके, सचिन घेनंद, दत्तात्रय शिंदे, विमल शेळके, शिला इचके, शोभा फटांगडे, कु. अपूर्वा वाळुंज, सविता ममदापुरे, सविता देशिंगे, प्रतीक्षा ममदापुरे, प्रतीक ममदापुरे, सुदर्शन फटांगडे, पियुष फटांगडे, स्वप्नल देशिंगे, नचिकेत शेळके यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. तसेच जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, दीपक सोनवणे, नलावडे सहभागी झाले.

भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष वाळुंज यांनी भूगोल फाउंडेशनच्या कामाची माहिती देऊन पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे महत्व पटवून दिले.

या प्रसंगी मुक्ताई वंचित आधार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शरद पोखरकर, माजी सरपंच जालिंदर डोंगरे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला खोडद गावच्या प्रभारी सरपंच सविता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, रवी मुळे, योगेश शिंदे, गणपत वाळुंज, संदीप घायतडके, सामाजिक कार्यकर्ते शिवदास खोकराळे, पत्रकार अशोक खरात, सुहास थोरात पाटील, अंबिका पतसंस्थेचे संचालक प्रकाश गायकवाड, वृक्षमित्र जालिंदर कोरडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.