Bhosari : कर्मचाऱ्याचा मानसिक छळ करून आत्महत्येस भाग पडल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर वर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-  ओव्हरटाईम करून घेत सतत कामावरून काढून (Bhosari ) टाकण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याने एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या ऑपरेशन  मॅनेजरवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडली.

सुशील भीमसिंह पाटील (वय 27 ) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी सुशील याचा भाऊ सागर भीमसिंह पाटील यांनी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.16) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी एस एच जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चाऑपरेशन मॅनेजर नीरज द्विवेदी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Thergaon : सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून जावयाची गळफास घेत आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील हा एस एच जे इंटर टेक प्रायव्हेट लिमिटेड या मध्य प्रदेश येथील कंपनीत काम करत होता. त्याचे काम हे वर्क फ्रॉम होम होते. यावेळी इंटरनेटचा अडथळा आला किंवा इतर काही अडचणी आल्या तर आरोपी हा फिर्याद सुशील याच्याकडून ओव्हरटाईम करत करून घेत होता.

तसेच ओव्हरटाईम नाही केल्यास पूअर रिमार्क दिला जाईल व मी नोकरीवरून काढून टाकेन.  इतर ठिकाणीही तुला काम मिळणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या आरोपी सुशील याला देत होता .सुशील च्या कामात काही अडचणी आल्या.

आरोपीने या प्रकरणी सुशीलला कोणतीही नोटीस न देता सरळ त्याला कामावरून काढून टाकले. याचा  मानसिक ताण येऊन  सुशीलने त्याच्या राहत्या घरी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली.

यावरून भोसरी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा द्विवेदी याच्यावर दाखल केला असून भोसरी पोलिस याचा पुढील तपास करत (Bhosari ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.