Thergaon : सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून जावयाची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज : घेतलेल्या पैशावरून सासरच्यांनी जावयाचा शारीरिक व मानसिक छळ(Thergaon) केला या छळाला कंटाळून जावयाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली ही घटना 25 ऑगस्ट 2023 रोजी थेरगाव येथे घडली.

मुकेश धनीराम शर्मा (वय 34 रा. सध्या थेरगाव,मूळ मध्यप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी मुकेश याचा भाऊ राजकुमार धनीराम शर्मा (वय 38 रा मध्य प्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.16) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मुकेश याच्या सासरकडील कृपाशंकर शर्मा (वय 60), पंकज कृपा शंकर शर्मा (वय 36) राघवेंद्र परमार (वय 28) व दोन महिला आरोपी सर्व राहणार मध्य प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत लॉजची तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश याने सासर कडून (Thergaon) काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत द्यावे म्हणून आरोपींनी त्याच्याकडे तगादा लावला होता. यातून ते मुकेशाचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.

या त्रासाला कंटाळून मुकेश याने थेरगाव येथील त्याच्या भाड्याच्या खोलीवर 25 ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास फॅनला वयारने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून वाकड पोलिसांनी पाचही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.