Talegaon Dabhade : कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत लॉजची तोडफोड

एमपीसी न्यूज : लॉज वरील कर्मचाऱ्यांना दमदाटी करून एका खोलीत कोंडले व जेसीबी (Talegaon Dabhade) मशीनच्या सहाय्याने क्लब ची भिंत व इतर गोष्टींची तोडफोड करण्यात आली ही घटना 15 ते 16 ऑक्टोबर दरम्यान तळेगाव चाकण रोडवरील अभिजीत लॉज येथे घडली.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महिलेने सोमवारी फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी राजेंद्र बाळासाहेब जांभुळकर वय 50 रा तळेगाव दाभाडे व त्यांचे इतर पंधरा ते वीस साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : प्रा. गणेश म्हस्के यांना पीएचडी प्रदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीच्या मालकीचे तळेगाव (Talegaon Dabhade) चाकण रोडवर अभिजीत नावाचे लॉज आहे. आरोपीने त्याचे 15 ते 20 साथीदारांसह लॉज वर प्रवेश केला. तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली व एका खोलीत डांबून ठेवले. जे सी बी च्या सहायाने लॉज ची एका बाजूची सुरक्षा भिंत, पाण्याची टाकी ,सिसी टी. व्ही. चे वायर यांची तोडफोड केली. परिसरात दहशत पसरवून नुकसान केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.