Talegaon Dabhade : प्रा. गणेश म्हस्के यांना पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या ( Talegaon Dabhade) कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च बी. फार्मसी महाविद्यालयातील प्रा. गणेश म्हस्के यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. एस. व्ही. डी. यू. बडोदा, गुजरात या विद्यापीठातून त्यांनी ‘डिझाइन,सिंथेसिस, क्यारेक्टेरीजेशन अँड बायोलोगिकल एवोल्यूशन ऑफ सम नोवेल हेटेरोसायकलिक क्विनोलिन डेरीव्हेटिवज’ या विषयात आपला शोधनिबंध सादर केला आहे.

या शोधप्रबंधासाठी बडोदा येथील डॉ. धन्या बी.सेन, डॉ.असीम सेन, डॉ. आशिष शहा व डॉ. राजेश माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे,विश्वस्त निरूपा कानिटकर सर्व पदाधिकारी संस्थाचालक आणि इंद्रायणी विद्या मंदिर परिवारातील  शाळांमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी,प्राचार्य सर्वांच्या वतीने डॉ.म्हस्के यांना ( Talegaon Dabhade) शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.