Vadgaon Maval : धर्म आणि निती या दरम्यानचे ज्ञान म्हणजेच गीता – डॉ. विजयकुमार फड

एमपीसी न्यूज – भगवत गीतेची सुरुवात धर्म या शब्दापासून होते.तर ( Vadgaon Maval ) शेवट नीती या शब्दावर होतो.या दोन शब्दांमधील ज्ञान म्हणजेच गीता आहे. हे ज्ञान सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. तर जीवनातील प्रत्येक समस्येवर ‘ज्ञानेश्वरी’ हेच रामबाण औषध आहे असे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आयएएस अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी सरस्वती व्याख्यानमालेत ‘गीता ज्ञानेश्वरी जीवनदृष्टी’ या विषयावर बोलताना सांगितले.

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे यंदा 23 वे वर्ष असून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम पुष्प गुंफताना आयएएस अधिकारी डॉ. विजयकुमार फड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोथरूड विधानसभेच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या होत्या.

तर अतिथी म्हणून भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर आणि प्रमुख पाहुणे म्हणून युवा किर्तनकार हभप जयश्री येवले तसेच व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ रवींद्र आचार्य,अध्यक्ष श्रीराम ढोरे, कार्याध्यक्ष अर्चना कुडे, कार्यक्रम प्रमुख सारीका भिलारे आणि पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे,निवृत्ती फलके,साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Same Gender Marriage : समलैंगिक विवाहाच्या प्रस्तावाला कायदेशीर मान्यता नाही, निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला – सुप्रीम कोर्ट

डॉ विजयकुमार फड यांनी पुढे बोलताना सांगितले की,अबाल वृद्धांना जीवनात पुढे पुढे जात  ( Vadgaon Maval ) असताना प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणी समोर ठाकतात .परंतु जीवनातील प्रत्येक समस्येवर ‘ज्ञानेश्वरी’ हेच रामबाण औषध आहे. तसेच कोणीही काही घेतल्या शिवाय देत नाही. घेती तेव्हा देती. संसार ही ज्ञानेश्वरी- गीता आहे असे डाॅ फड यांनी सांगितले.

आपले जीवन सुंदर आहे. स्वतःवर प्रेम करावे. भावाचे कुंकू असावे. तुमचे दुःख घ्यायला कोणी बसले नाहीत, दुसऱ्यांना  रडगाणे सांगू नका, ते स्वतःला सांगा असेही डाॅ फड म्हणाले.

“घराघरात स्रीचा सन्मान होईल तेव्हाच नवरात्रोत्सव साजरा करण्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल” असे मत युवा किर्तनकार हभप जयश्री येवले यांनी व्यक्त केले.

“देशाच्या पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीमध्ये केंद्रीय कायदे मंडळात महिलांना एक तृतीयांश प्रतिनिधित्व देण्याची घोषणा करून नवभारताच्या उभारणीतील महिलांच्या योगदानाचा पंतप्रधांनांनी सन्मान केला आहे” असे मत भाजपाचे मा.राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

“पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे. तसेच वडगाव मावळची ओळख हे पुणे ग्रामीणची सांस्कृतिक राजधानी अशी बनत चालली आहे” असे आपल्या मनोगतात कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल क्रीडा प्रशिक्षक सुधीर म्हाळसकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

सरस्वती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष श्रीराम ढोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थापक कार्याध्यक्ष डॉ रविंद्र आचार्य यांनी प्रास्ताविक केले.

सूत्रसंचालन श्री.पोटोबा देवस्थान संस्थानचे विश्वस्त ( Vadgaon Maval )  सचिव अनंता कुडे यांनी केले तर, मानपत्र वाचन प्रिया राऊत यांनी आणि आभार प्रदर्शन माजी नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.