PCMC : महापालिकेतील 173 कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी पदोन्नती, लिपिकांनी घेतला आक्षेप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील 137 ( PCMC ) अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, एलएसजीडी परीक्षा प्रशासनाने घेतली नसताना आम्हाला पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप लिपिकांनी केला आहे.

महापालिकेत पदोन्नती समितीची बैठक झाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवा ज्येष्ठता, गोपनीय अहवाल, शिस्तभंग, संगणक अर्हता आदी तपशील पडताळून पाहण्यात आला. त्यानंतर पदोन्नती समितीच्या शिफारसीनुसार कार्यकारी अभियंता (वि)-1, उपअभियंता (वि)-1, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी-1, कार्यालय अधिक्षक-21, मुख्य लिपिक-90, सिस्टर इनचार्ज-14, बीजतंत्री-3, गटनिदेशक-3, कनिष्ठ अभियंता (वि)-2, कनिष्ठ अभियंता (स्था)-1 अशा 137 जणांना विविध पदावर पदोन्नती देण्यात आल्या आहेत.

Talegaon Dabhade : प्रा. गणेश म्हस्के यांना पीएचडी प्रदान

महापालिका सेवाप्रवेश नियमावलीस सन 2020 मध्ये शासनाने मंजूरी दिली आहे. नियमातील तरतुदीनुसार विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यापूर्वी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. मात्र, 3 वर्ष कालावधी होऊनही पालिकेने विभागीय परिक्षेचे धोरण निश्‍चित केलेले नाही. त्यामुळे सेवा प्रवेश नियमावली मंजूर होण्या पूर्वीच्या अहर्तेनुसार एलएसजीडी परीक्षेलाच ( PCMC ) अर्हतकारी विभागीय परिक्षा गृहीत धरून पदोन्नती देण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्तांनी घेतला होता.

त्यानुसार यावेळेसही कार्यवाही केली. मुख्य लिपिक पदासाठी पात्र असूनही 40 सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना विभागीय परिक्षा, पुर्वीचे अहर्तेनुसार ग्राह्य धरण्यात येणारी एल. एस. जी. डी. परिक्षा उत्तीर्ण नसल्याने पदोन्नती पासून वंचित राहावे लागले आहे. वास्तविक पाहता कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे प्रशासनामार्फत विभागीय परिक्षा व ज्या एल.एस.जी.डी. परिक्षेच्या आधारे पदोन्नतीसाठी दोन्ही परिक्षेस बसण्याची संधी देण्यात आली नाही. ही बाब पुर्णतः नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधास असून त्यामुळे कालबद्ध पदोन्नतीपासून मुकावे लागल्याचा आरोप लिपिकांनी केला आहे.

पूर्वी एलएसजीडी नावाची परिक्षा होती. 2020 मध्ये विभागीय परिक्षा घेण्याचे ठरले. पूर्वी एलएसजीडी ही परिक्षा झालेली कर्मचारी आहेत. यापूर्वीच्या आयुक्तांनी एलएसजीडी परिक्षाच विभागीय परिक्षा गृहित धरून पदोन्नती दिली. त्यानुसारच आताही एलएसजीडी हीच विभागीय परिक्षा गृहित धरून पदोन्नती दिली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी ( PCMC ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.