Pimpri : भांडणाचा जाब विचारला म्हणून तरुणाच्या डोक्यात तलवारीने वार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – बहिणीशी झालेल्या भांडणाचा जाब ( Pimpri ) विचारला म्हणून एकाने तरुणावर थेट तलवारीने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.16) पिंपरी गाव येथे घडली आहे.

Talegaon Dabhade : कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत लॉजची तोडफोड

पोलिसांनी अभि सुनिल कापसे (वय 25 रा.पिंपरी गाव) याला अटक केली आहे. याप्रकरणी आकाश ज्ञानेश्वर उईके (वय 25 रा. पिंपरीगाव) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ( Pimpri ) आहे.यात जखमी तरुणाचे नाव हे ऋषिकेश उर्फ मोन्या  शामराव वाघेरे (वय 24 रा. वाकड) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोन्या याला आरोपीने बोलायचे आहे म्हणून बोलावून घेतले. मोन्या याने अभिला त्याच्या मानलेल्या बहिणीशी झालेल्या भांडणाचा जाब विचारला.

याच रागातून अभिने जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने अभिच्या तोंडावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले.  पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत ( Pimpri ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.