Wakad : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 35 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल चोरी करणाऱ्या (Wakad) महिलेसह दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 17 लाख रुपये किमतीचे 35 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी (वय 20, रा. वडगाव मावळ पुणे. मूळ रा. गुजरात) आणि त्याचे साथीदार महिला यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Thergaon : सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून जावयाची गळफास घेत आत्महत्या

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात होणाऱ्या (Wakad) चोरीच्या अनुषंगाने वाकड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत होते. त्यामध्ये एक महिला आणि तिचा साथीदार चोरी करताना पोलिसांना आढळून आले.

त्यानुसार पोलिसांनी ताथवडे परिसरातून कन्हैयालाल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन मोबाईल फोन आढळले. त्याच्या साथीदार महिलेचा शोध घेऊन तिलाही ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडेही सुरुवातीला दोन मोबाईल फोन आढळले.

दोघांकडे तपास करत वाकड पोलिसांनी 17 लाख रुपये किमतीचे 35 महागडे मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींनी चिंचवड, निगडी, खडक, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगितले. यामध्ये सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. अन्य मोबाईलबाबत वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.