Bhosari : विनाचालक टेम्पो पुढे सरकल्याने एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – विना चालक टेम्पो पुढे सरकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघातात शनिवारी (दि. 5) सकाळी साडेआठच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेच्या जवळील मोकळया पार्किंगमध्ये झाला.

छबुराव कुंडलिक बिडबाग (वय 35, रा. पिंपरी बेलदार, ता. जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन सदाशिव मदने (वय 24, रा. दत्तमंदिर, राजवाडा इंद्रायणीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवा नाना मदने (45, रा. इंद्रायणीनगर, एमआयडीसी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगर सेक्टर क्रमांक दोन येथील प्रियदर्शनी शाळेच्या मोकळया जागेवर काहीजण बसले होते. त्यावेळी सचिन मदने याने टेम्पो चालू केला. टेम्पो चालू करून तो खाली उतरला. त्यावेळी त्याने हॅन्डब्रेक लावला नाही. त्यामुळे टेम्पो पुढे गेला. या टेम्पोखाली छबुराव बिडबाग सापडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.