Chinchwad : समाजाच्या पाठींब्यामुळेच मी आज शहराचा महापौर …राहुल जाधव   

एमपीसी न्युज  – स्त्री शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याला यथोचित सन्मान मिळायला हवा त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमुळे महिलांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते .समाजाच्या पाठींब्यामुळेच मी आज शहराचा महापौर बनू शकलो असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजातील कष्टकरी, स्वावलंबी, स्वत:च्या हिमतीवर पुढे येणाऱ्या, आलेल्या, संकटाची तमा न बाळगता आपआपल्या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या किंबहुना इतर स्त्रिया आणि समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन करण्यात येतो.
बिजलीनगर येथील चैतन्य सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या वेळी महापौर बोलत होते.यावर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २७ महिलांचा सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माजी महापौर अपर्णा डोके,अनिता फरांदे,ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे,नगरसेविका अश्विनी चिंचवडे,रेखा दर्शले,आयुकातील संशोधक संतोष भुजबळ,शिक्षणाधिकारी सुषमा शिंदे,माळी महासंघाचे विश्वस्त अण्णा गायकवाड ,निर्माता मुकेश कणेरी,चेतन भुजबळ,सुहास गार्डी ,राजेश करपे,नरहरी शेवते,विश्वास राऊत,सूर्यकांत ताम्हाणे,अनिल साळुंके आदी उपस्थित होते.
पुरस्कार्थी :
आदर्श माता : पार्वतीबाई जमदाडे,शांताबाई माळी, कमला भोंडवे,सुंदर भोसले,लक्ष्मीबाई करपे,द्रौपदाबाई भुजबळ,जगदेवी नेल्लगी,जयवंताबाई लोखंडे.
समाज भूषण : मालती भुजबळ,अश्विनी गायकवाड,लक्ष्मीबाई गायकवाड,कविता वाल्हे,उमा क्षीरसागर, छाया गोरे,फरीदा मुल्ला
उद्योग भूषण :मनीषा गवळी,विद्या भागवत

आदर्श शिक्षिका : श्रीप्रिया नागराजन, पूनम बंब,सुषमा पाटील
कला भूषण : स्नेहा सावजी,सायली सोनवणे,सिमरन सय्यद
पत्रकार भूषण : अर्चना मोरे
क्रीडा भूषण : गिरीजा लांडगे,प्रगती गायकवाड
प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले. आभार हिरामण भुजबळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.