Bhosari : प्रेयसीसोबत बोलल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला आणि कुटुंबियांना मारहाण

एमपीसी न्यूज – प्रेयसीसोबत बोलला (Bhosari) या कारणावरून एका अल्पवयीन मुलाला व त्याच्या कुटुंबाला तिघांनी बेदम मारहाण करत धमकी दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.13) भोसरी येथे घडला.

याप्रकरणी रोशन शैलेश सिंग (वय 19 राहणार भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी रमेश शिवाजी लोखंडे, सुरेश शिवाजी लोखंडे (वय 26), अमित शंकर राठोड (वय 24) सर्व राहणार भोसरीगाव यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 17 वर्षाचा भाऊ हा अमितच्या प्रेयसीसोबतसोबत बोलला याच्या रागातून आरोपींनी त्याला मारहाण करत शिवीगाळ केली आहे.

Breaking News : कोंढवा येथे गॅस गळतीने आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर

यावेळी फिर्यादी व त्यांचे आई वडील भांडणे सोडवण्यासाठी आले. आरोपींनी अल्पवयीन मुलासह त्याच्या कुटुंबालाही शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फिर्यादी हे जखमी (Bhosari)  झाले आहेत. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.