Bhosari : शिवीगाळ करू नको म्हटल्याने भावाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – भाऊ आणि भावाच्या (Bhosari) पत्नीला शिवीगाळ करू नको म्हटल्याने भावाने बेदम मारहाण केली. ही घटना 24 जून रोजी रात्री साडेआठ वाजता रामनगर बोपखेल येथे घडली.

दिलीप बन्सी डोंगरे (वय 43, रा. रामनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश बन्सी डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : सनातन संस्थेच्यावतीने चिंचवड येथे ठिकठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे (Bhosari) भाऊ प्रकाश आणि भावाची पत्नी यांना शिवीगाळ करू नका असे म्हटले. त्या रागातून प्रकाश यांनी फिर्यादीत लोखंडी रॉडने डोक्यात, पाठीत, हातावर, पायावर मारून गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.