Bhosari : ‘त्या’ गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून हवेत गोळीबार करीत पाच तोळ्यांची चेन हिसकावून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) सकाळी अकराच्या सुमारास गणेशनगर, भोसरी येथे घडली होती.

ज्ञानेश्वर रामदास लांडगे (रा. गवळीमाथा, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर, गणेश तिम्मा धोत्रे (रा. गवळीमाथा, भोसरी) आणी मल्लेश कोळवी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे अद्यापही फरार आहेत.

याप्रकरणी प्रशांत बाळासाहेब लांडगे (30, रा. गणेशनगर, भोसरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत आणि आरोपी ज्ञानेश्वर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जुनी भांडणे आहेत. सकाळी अकराच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर साथीदारांना घेऊन प्रशांत यांच्या घरी आला. त्यावेळी आरोपींनी प्रशांत यांना शिवीगाळ केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर याने हवेत गोळीबार करीत प्रशांत यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची चेन हिसकावून नेली. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.