Bhosari Crime : चाकूचा धाक दाखवून रोकड पळवली

एमपीसी न्यूज – चाकूचा धाक दाखवून दोन चोरट्यांनी नऊ हजारांची रोकड पळवली. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता आंबेडकर चौक, भोसरी येथे घडली.

राजेश अंबादास लबडे (वय 40, रा. आंबेडकरचौक, भोसरी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 14) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लबडे त्याच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवला आणि फिर्यादी यांच्या खिशातून नऊ हजारांची रोख रक्कम काढली आणि पळून गेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.