Bhosari Crime News : बोगस जामीनदार प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बोगस जामीनदार दिल्याप्रकरणी सात जणांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी बोगस जामीनदार प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्‍वनाथ बोजा शेट्टी (वय 56, रा. वनराज हॉटेल, भोसरी), विशाल विजय काळे (वय 21), सिद्धार्थ विजय काळे (वय 23, दोघेही रा. शंकरनगर, चिंचवड), सुनील मारूती गायकवाड (वय 52, रा. चावडी चौक, आळंदी), सुरेश विश्‍वनाथ चंद्रवंशी (रा. मरकळ रोड, आळंदी) आणि दोन महिला आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी वैभव विठ्ठल एरंडे यांनी बुधवारी (दि. 22) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसांत संगनमत करून बनावट कागदपत्र तयार करून केली. आरोपी शेट्टी, विशाल काळे, सिद्धार्थ काळे, आणि महिला आरोपी यांना बोगस जामीनदार असल्याचे माहिती होते. तर उर्वरित आरोपी आपसांत संगनमत करून शासनाची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.