Bhosari Crime News : तीन वृद्धांकडून पकडला साडेचार किलो गांजा; दोन वृद्ध महिलांचाही समावेश

एमपीसी न्यूज – विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या तिघांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन वृद्ध महिला आणि एक वृद्ध नागरिकाचा समावेश आहे. तिघांकडून पोलिसांनी एक लाख 30 हजार 55 रुपये किमतीचा चार किलो 603 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने भोसरी येथे शनिवारी (दि. 5) ही कारवाई केली.

माणकाबाई शहाजी वाघमारे (वय 65, रा. आंबेडकर नगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी), मामू ऊर्फ रउफ खान रमजान खान (वय 83, रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी, लांडेवाडी, भोसरी), सावित्रीबाई युवराज गायकवाड (वय 70, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे विक्री करण्यासाठी गांजा बाळगत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून कारवाई केली. भोसरीतील लांडेवाडी येथील आंबेडकर नगर झोपडपट्टी व विठ्ठल नगर झोपडपट्टी तसेच एमआयडीसी येथील बालाजी नगर झोपडपट्टी येथे सापळा रचून छापा मारला. या कारवाईत एक लाख 30 हजार 55 रुपये किमतीचा चार किलो 603 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.