Bhosari Crime News : अल्पवयीन मुलीचे लग्न; मौलवीसह नऊ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी लग्न लावल्याप्रकरणी लग्न लावणाऱ्या मौलवीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 मध्ये खडकी येथे घडला. 

या प्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने रविवारी (दि. 25)  भोसरी ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती  चांद सलीम शेख (वय 22), राजिया सलीम शेख (वय 50), अंजुमन सलीम शेख (वय 24), जबिनजावेद शेख (वय 33), पापा सय्यद (वय 50), फर्जाना मुलतानी (वय 33), यास्मिन सय्यद (वय 22, सर्व रा. दापोडी) आणि लग्न लावणारा  मौलाना (नाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीचे वय कमी असल्याचे माहिती असूनही आरोपींनी आपसात संगनमत करून आरोपी चांद याच्याशी तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर मुलीने रविवारी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.