Bhosari Crime News : भोसरी एमआयडीसी परिसरातून दोन पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावले

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पादचारी नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना बुधवारी (दि. 22) रात्री घडल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 23) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालसिंग भिकाजी राठोड (वय 43, रा. दिघी रोड, भोसरी. मूळ रा. यवतमाळ) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड हे बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बँकर वस्ती, मोशी येथून पुणे-नाशिक महामार्गावरून चालत जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी राठोड यांचा 12 हजारांचा मोबाईल फोन हिसकावून नेला.

त्यानंतर रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास विश्वेश्वर चौक, भोसरी एमआयडीसी येथे तेजस अर्जुन तांगडे यांचा 15 हजारांचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.