Bhosari Crime News : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. याबाबत सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण संतोष पाटील, महेश संतोष पाटील, शांताबाई संतोष पाटील, योजनाबाई राजेंद्र पाटील, राजेंद्र बाबुलाल पाटील, राजेश राजेंद्र पाटील, शिवाजी नथू पाटील, चंद्रकांत नथू पाटील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुवर्णा पाटील असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत प्रशांत रामकृष्ण पाटील (वय 32, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत यांची मयत बहीण आणि आरोपी अरुण यांचा विवाह झाला होता. सासरच्या लोकांनी फिर्यादी यांच्या बहिणीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच तिला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.